बस अपघातात मृत पावलेल्या श्वेतानं केलं नेत्रदान

January 25, 2012 2:50 PM0 commentsViews: 21

25 जानेवारी

पुण्यात झालेल्या बस अपघातात 28 वर्षाच्या श्‍वेता ओसवालला जीव गमवावा लागला. पण जगाचा निरोप घेण्याआधी तिनं नेत्रदानाची इच्छा बोलून दाखवली. गंभीर जखमी असलेल्या श्वेताला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण श्‍वेताला वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. श्वेताचा मृत्यू ओढवला पण तिच्या कुटुंबीयांनी यातून सावरून तत्काळ तिचं नेत्रदान केलं. अपघाती मृत्यूपूर्वी नेत्रदानाचा निर्णय घेऊन श्वेतानं सगळ्यांसाठी एक आदर्शच घालून दिला.

close