राजपथावर चित्तथरारक कसरती

January 26, 2012 11:57 AM0 commentsViews: 4

26 जानेवारी

आज देशभरात 63 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतोय. दिल्लीत आज ध्वजारोहण करण्यात आलंय. तिन्ही सैन्यदलांनी राजपथावर देशाच्या संरक्षण शक्तीचं प्रदर्शन केलंय. यावेळी सार्‍या देशाला लष्करी शक्तीचे दर्शन घडलं. यात देशातल्या तिन्ही सैन्य दलांतल्या वेगवेगळ्या रेजिमेंट्स, रणगाडे आणि क्षेपणास्त्रं होती. त्याचबरोबर सैन्याच्या मानवंदनेनंतर राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ राजपथावर दाखल झाले. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैशिष्ट्य म्हणजे 2011-2012 हे वर्ष पर्यटन वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातले पर्यटनस्थळ महाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसले. अजिंठ्‌याचं कैलास मंदिराचा देखावा यावेळी सादर करण्यात आला.

close