उमेदवार निवडीचे राज यांचे मजेदार किस्से

January 27, 2012 12:00 PM0 commentsViews: 105

27 जानेवारी

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रभादेवी येथे रविंद्र नाट्यमंदिरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद सादत असताना राज यांनी उमेदवारांची यादी उद्या किंवा परवा जाहीर करणार आहोत असं जाहीर केलं. त्याच बरोबर राज्यभरात घेण्यात आलेल्या पक्षांच्या मुलाखतीत एका पेक्षा एक भेटलेल्या कार्यकर्त्यांचे किस्से सांगितले. ज्या वेळेस मी उमेदवारांच्या मुलाखती घेत होतो तेव्हा बाहेर असलेल्या इच्छुक उमेदवाराला एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला की, जर उमेदवारी भेटली नाही तर काय करणार ? यावर कार्यकर्ता म्हणतो, रात्री भरपूर दारु पिणार….वाईट वाटलं म्हणून फूल टाईट होणार..आणि सकाळी परत पक्षाच्या कामाला लागणार…!! राज यांच्या या किस्याने सभागृहात एकच हश्या पिकल्या टाळ्या आणि शिट्यांनी नाट्यगृह कार्यकर्त्यांनी दणाणून सोडले. यावर राज यांनी मला त्याची भावना आवडली पण असा काही आदर्श घडवू नका असं ही बजावून सांगितले.

close