खा.उदयन राजे भोसलेंची ‘हिरोगिरी’

January 27, 2012 4:05 PM0 commentsViews: 242

27 जानेवारी

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत पुनरागमन केलं आहे. सातार्‍यामध्ये झालेल्या सम्राट श्री स्पर्धेत खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या शर्टाची बटणं काढून आपली बॉडी दाखवण्याचा प्रयत्न केला. उपस्थित प्रेक्षकांनीसुद्धा त्यांच्या या प्रयत्नांना उत्स्फुर्त दाद दिली. नेहमीच काहीतरी वेगळं करुन चर्चेत असणारे उदयनराजे यांनी पुन्हा एकदा आपलं वेगळंपण दाखवून दिलं आहे.

close