शरद पवार यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत (भाग 2)

February 4, 2012 3:51 PM0 commentsViews: 12

30 जानेवारी

वासरदार ही कल्पनाच आपल्याला मान्य नाही, ती सरंजामशाहीतली कल्पना आहे. कोणी नेमून वारसदार होत नसतो. त्यासाठी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण व्हावी लागते, असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारसदार नेमण्यास नकार दिलाय. राजकारणात 20 ते 25 वर्षं काढल्यानंतर अजित पवार किंवा दुस•या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा बाळगल्यास त्यात काहीही गैर नाही असंही त्यांनी मुलाखतीच्या दुसर्‍या भागात स्पष्ट केलं. आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी पहिल्यांदाच अजित पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं राजकारण, बाळासाहेबांविषयीची खास मैत्री याविषयीची आपली स्पष्ट मतं व्यक्त केली.

2014 च्या निवडणुका आपण लढवणार नाही असं शरद पवार यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत जाहीर केलं आणि राष्ट्रवादीच्या गोटात आता पुढे काय असा प्रश्न पडला. पवारांचा वारसदार कोण असणार अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. पण राजकारणात 'मास्टरमाईंड' समजल्या जाणारे शरद पवार यांनी आपल्या शैलीत याचे उत्तर दिले. वारसदार ही कल्पनाच मान्य नाही, ती सरंजामशाहीतली कल्पना आहे कोणी नेमून वारसदार होत नसतो त्यासाठी लोकांमध्ये त्याच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण व्हावी लागते जर विश्वासार्हता नसेल तर जास्त काळ टिकता येत नाही असं सांगत शरद पवार यांनी वारसदार नेमण्यास नकार दिला.

अजित पवार आणि काही सहकार्यांबद्दल लोकांमध्ये विश्वासार्हता वाढत आहे आणि ही जमचे बाजू आहेत पण आम्ही जाहीर करुन टाकलं की हा माझा वारसदार आहे असं होतं नाही असंही पवारांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर अजितदादांकडे जलसंपदा खाते होते तेव्हा त्यांनी ज्या जिल्हात, जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे त्यांनी काम मार्गी काढली त्यामुळे आज ही मला जी लोक भेटतात त्यांच्यामुळे हे होऊ शकलं असं सांगतात मुळात अजितदादा हे कार्यशील आहे त्यांना ज्या ठिकाणी मदत देऊ वाटली तिथे ते तातडीने कामाला लागतात अशी अजितदादांची कौतुकाने पाठ थोपटली. पण त्याचबरोबर अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला स्पीड ब्रेकर लावला.

मुख्यमंत्रीपदासाठी त्यांची इच्छा काही गैर नाही, आणि त्यात काही चुकीचे नाही असं मला वाटतं पण त्यांनी आणखी जनसंपर्क वाढवावा आणखी मेहनत घ्यावी, लोकांमध्ये मिसळावे असा सल्ला पवारांनी दिला. तसेच कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चांगली काम केली तर ती माझ्या लक्षात येतात आणि त्यांची मी दखल घेतो एक पक्षप्रमुख म्हणून मला सर्वांकडे लक्ष देण कर्तव्य आहे असं स्पष्ट केलं.

close