समुद्र हक्काची लढाई

January 30, 2012 6:15 PM0 commentsViews: 83

कोकणात मच्छीमारांचा संघर्ष शिंगेला पोहचला आहे. त्यांच्या समस्यासाठी आज मच्छीमार रस्त्यावर उतरला आहे. आज गळाला काय लागणार ? हा प्रश्न सर्वच मच्छीमारांना पडतोय पण दिवसाला एक दोन मासे जाळ्यात आणि दिडशे ते दोनशे रुपये त्याची कमाई यावरच कुटुंबाचा उदनिर्वाह चालवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे. मालवणच्या देवबाग, वायरी, दांडी किनार्‍यावर राहणारे मच्छीमार गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पध्दतीने मासेमारी करत आहे. हे मच्छीमार छोट्या फ़ायबर बोटी आणि गिलनेट जाळ्यांचा वापर करुन मच्छीमारी करतात. पण पर्ससीन जाळं वापरणार्‍या धनिक मच्छीमारांमुळे आपला हा व्यवसाय धोक्यात आल्याची या मच्छीमारांची भावना आहे. महाराष्ट्राच्या रेग्यूलेशन ऍक्टनुसार 0 ते 10 फॅदम अंतर पारंपरिक मच्छीमारांसाठी राखीव आहे. पण या क्षेत्रावर पर्ससीनवाल्यांचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार संकटात सापडला आहे.

close