रितेश आणि जेनेलियाचा संगीत सोहळा

February 1, 2012 12:15 PM0 commentsViews: 47

01 जानेवारी

संपूर्ण बॉलिवूड काल रात्री ताज लॅण्ड एंड्समध्ये अवतरलं होतं. निमित्त होतं रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांचं संगीत…सध्याचं हॅपनिंग कपल म्हणून ओळखल्या जाणार्‍या रितेश आणि जेनेलिया या दोघांच्या लग्नाला आता उद्यावर येऊ ठेपलं आहे. तेव्हा बॉलिवूडचे पाहूणे लगीनघाईत मग्न झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या संगीत सोहळ्याला ऋषी कपूर-नीतू कपूर, गौरी खान, अभिषेक बच्चन, संजय दत्त अशा बॉलिवूडच्या तार्‍यांनी हजेरी लावून ग्लॅमर वाढवले. तर रितेश आणि जेनेलिया ही दोघं सगळ्यांसाठी एकत्र पोझ करण्यात खुश दिसले. तेव्हा एकूणच हा संगीत सोहळा वर आणि वधू बरोबरचं…पाहूण्यांनी देखील मजा आणली.

close