राष्ट्रवादीचा जन्म वैयक्तिक महत्वाकांक्षेतून -मुख्यमंत्री

February 5, 2012 12:04 PM0 commentsViews: 64

02 जानेवारी

व्यक्तिगत टीका करणे योग्य नाही, टीका करताना मंत्र्यांनी संयम बाळगावा असा सल्ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार आणि नारायण राणे दिला. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. राष्ट्रवादीचा जन्म वैयक्तिक महत्वाकांक्षेतून झाला असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. तर महापालिका, जिल्हापरिषद निवडणुकांवर त्यांनी मत मांडली. मुंबई महापालिकेत युतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच मुंबई महापालिकेत आघाडीची सत्ता येईल असं विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. जर आमची सत्ता पालिकेत आली तर भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना धडा शिकवू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

close