अफवांमुळे भांडुपकरांसाठी रात्र वैर्‍याची

February 2, 2012 4:12 PM0 commentsViews: 10

02 फेब्रुवारी

मुंबईतल्या भांडुप परिसरात सध्या चोरांच्या भीतीमुळे दहशतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे भांडुपकरांची झोप उडाली आहे. एकीकडे रात्रभर चोरांच्या भीतीमुळे पहारा देणारे नागरिक तर दुसरीकडे पोलिसांकडे चोरांची कुठलीही तक्रार आली नाही आहे. या सगळ्या घटनांमुळे भांडुपचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. चोरांची एक टोळी रात्री घरात घसून संपत्तीची लुट करतात यासाठी ते प्राणघातक हल्लाही करतात अशी अफवा या परिसरात पसरली आहे.काही दिवसांपूर्वीच डोंबिवली परिसरात याच चोराच्या टोळीने एक घर लुटले होते आणि घरातील कुटुंबीयावर प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नेमकी काय परिस्थिती आहे, त्याबद्दल सांगतोय आमचा रिपोर्टर उदय जाधव…

close