मुंबईतील स्काय वॉक प्रकल्पाला मंदीचा फायदा

December 16, 2008 6:44 AM0 commentsViews: 3

16 डिसेंबर, मुंबईअमेय तिरोडकरमुंबईत सुरू असलेल्या स्कायवॉक प्रकल्पाचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे. स्कायवॉकच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर स्टीलचा वापर होतो. पण आर्थिक मंदीमुळे स्टीलची उतरलेली किंमत या प्रकल्पासाठी फायदेशीर ठरलीय. यात एमएमआरडीएचे सुमारे शंभर कोटी रूपये वाचतील असं म्हटलं जात आहे. सहा महीन्यांपूर्वी स्टीलची किंमत गगनाला भिडली होती. त्याचवेळेला या प्रकल्पाचं काम सुरू झाल्यामुळे ही किंमत वाढली असं एमएमआरडीएचं म्हणणं आहे. "आज चाळीस हजाराला मिळणारं स्टीलव तेव्हा चौपन्न ते अठ्ठावन्न हजारांपर्यंत गेलं होतं. आणि त्यावेळची किंमत लावली गेली मात्र आता स्टीलच्या किमती उतरल्याने खर्चात सात ते आठ टक्के बचत होऊ शकते" असं एस. आर. नंदर्गीकर यांनी सांगितलं.एमएमआरडीए एकूण चौपन्न स्कायवॉक बांधणाराय. त्यापैकी स्वत: एमएमआरडीए 32, एमएसआरडीसी 14, बीएमसी 3, आणि कल्याण डोंबिवली महापालिका एका स्कायवॉकचं बांधकाम करणाराय. सध्या पन्नास ठिकाणी कामं चालू झाली आहेत. बाकी चार स्कायवॉकच्या जागा ठरलेल्या नाहीत. येत्या मे ते सप्टेंबरपर्यंत हे स्कायवॉक बांधून पूर्ण होतील. पण तेव्हाही स्टीलच्या किमतीत होणार्‍या चढ-उतारावर या प्रकल्पाचा खर्च अवलंबून असेल असं जाणकारांचं म्हणणं आहे.

close