शरद पवारांच्या आबा-दादांना कानपिचक्या

February 3, 2012 12:56 PM0 commentsViews: 23

03 फेब्रुवारी

गेले काही दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता. यावर आता शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहे. काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करताना संयम पाळा असं शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून निर्माण झालाय, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएन-लोकमतच्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज उत्तर दिलं. आमचा पक्ष ज्या ठिकाणी काम करतो तो सहकारर्‍यांकडे पाहून काम करतो इतरांसारखा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे पाहून काम करत नाही असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला.