राज ठाकरेंचा मुलगा अमित उतरला प्रचाराच्या मैदानात

February 6, 2012 5:38 PM0 commentsViews: 238

06 फेब्रुवारी

ठाकरे घराण्याची तिसरी पिढी आदित्य ठाकरे यांच्या रुपाने राजकारणात दाखल झाली. आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हा ही आता प्रचाराच्या मैदानात उतरला आहे. आज मनसेच्या मुंबई झालेल्या रोड शोमध्ये अमित ठाकरे सहभागी झाला आहे. यानंतर आता ठाण्याच्या रोड शोमध्येही अमित सहभागी होणार आहे. अमित हा आर्किटेक्टरच्या दुसर्‍या वर्षाला शिकत आहे. आता आदित्य ठाकरेनंतर आता अमितही प्रचारात सहभागी झाल्याने अमितही राजकारणात सक्रीय होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. नेमकं अमित प्रचाराकडे, निवडणुकीकडे कसा बघतोय. त्याला त्याबद्दल काय वाटतंय याबद्दल त्याच्याकडून जाणून घेतलंय आमचा सीनियर करस्पाँडंट विनोद तळेकर यांनी…

close