‘कोलावरी’वर मनसेचं इंजिन..,’ढिंक चिंका’वर कमळ..!!

February 6, 2012 11:48 AM0 commentsViews: 23

प्रवीण सपकाळ, सोलापूर

06 फेब्रुवारी

प्रचारासाठी तुम्हाला काय पाहिजे ?….कोलावरीच्या चालीवरचं की उ..ला..ला..च्या धूनवरचं गाणं?…सगळं काही मिळेल. सोलापुरातल्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अगदी पाहिजे ते मिळतं…तुम्ही फक्त फर्माइश करा.. कोलावरी डीच्या चालीवर प्रचारासाठी मनसेचं इंजिन धावत आहे अशी धमाल गाणी तयार होत आहे ती सोलापूरच्या मिलन रेकॉर्डिंग स्टुडिओत. हे आहे. तसेच अलीकडेच सुपरहिट झालेलं डर्टी पिक्चर,चांदणं झाली रात लोकगीताच्या फडफडत्या चालीवर गाणी रंग भरत आहे. उमेदवारांचं नाव, पक्ष, चिन्ह . त्याचं काम….हे सगळं उमेदवारांना गाण्यातून हवं असतं. लोकप्रिय चाली आणि त्यावरची अशी करामती गाणी…. उमेदवारांचा प्रचार अगदी घरोघरी पोहोचवण्यासाठीच ही अगदी अक्कडबाज शक्कल…

close