ज्युनियर ठाकरे निवडणुकीच्या प्रचारात

February 6, 2012 3:20 PM0 commentsViews: 9

विनोद तळेकर, मुंबई

06 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकांच्या प्रचारात ठाकरे घराण्याची तिसरी पिढीही उतरली आहे. उध्दव ठाकरेंचा मुलगा आदित्य आणि राज ठाकरे यांचा मुलगा अमित सध्या रोड शो दरम्यान सगळ्यांच्या आकर्षणाचा विशेष ठरले आहे.

आधी आदित्य ठाकरे आणि आता अमित ठाकरे.. ठाकरे घराण्यातील हे दोन नवे चेहरे, सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात हे दोन्ही ठाकरे सक्रिय झाले आहेत. युवा सेनेच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वीच आदित्यने राजकीय वाटचाल सुरु केली. अमित ठाकरे मुंबईतल्या प्रचार शोमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसतोय. ठाण्यातल्या रोड शोमध्येही अमित सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येतं आहे. प्रचारादरम्यान वडिलांना मिळणार्‍या प्रचारामुळे अमित भारावून गेला आहे. एकूणच ठाकरे घराण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेला प्रभाव आणि दरारा लक्षात घेता, या दोन्ही तरुणांवर अपेक्षांच ओझ असणार हे नक्की, आदित्यनं सक्रिय राजकारण्यात प्रवेश केला. आता अमितही त्याच्या पावलावर पाऊल टाकणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

close