पवारांची मिठी अफझलखानी -उध्दव ठाकरे

February 6, 2012 1:41 PM0 commentsViews: 41

06 फेब्रुवारी

दगाबाज मित्रापेक्षा समोर असलेला शत्रु चांगला पण शरद पवारांची मिठी ही अफझलखानी आहे मित्राच्या नावावर पाठीत खंजीर खुपसतात अशी जहरी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केली. तसेच शिवसेनाला तोडून काँग्रेसला मुंबईचा लचका तोडायचा आहे अशी टीकाही त्यांनी केली. उध्दव ठाकरे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखत ते बोलत होते.

महापालिकांच्या निवडणुकांचे मैदान आता स्पष्ट झाले आणि पक्षांनी मैदानात उतरायला सुरुवात केली. गेली 17 वर्ष महापालिकेवर भगवा झेंडा कायम फडकवत शिवसेनेनं याही वर्षी महायुती करत सत्ता कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आयबीएन लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी उध्दव यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. शरद पवार यांना विश्वासार्हता नाही आणि हीच त्यांची विश्वासार्हता आहे बाळासाहेब ही सांगतात दगाबाज मित्रापेक्षा समोर असलेला शत्रु चांगला म्हणून पवारांची मिठीही अफजलखानी आहे समोरुन मिठी मारायची आणि पाठीमध्ये खंजीर खुपसायचे अशी जहरी टीका उध्दव ठाकरे यांनी केली. बाळासाहेबांची सभाही त्यांच्या मर्जीने ते घेत आहे त्यांना मी आडवू शकत नाही शेवटी बाळासाहेबांचे शिवसैनिक प्राण आहे त्यामुळे या वयात त्यांची सभा घेण्याची आजही गरज पडते असे मुद्देही उध्दव ठाकरेंनी फेटाळून लावले.

तसेच मुंबई पालिकेचे त्रिभाजन करण्यात यावे असे म्हणणार्‍यांचे त्रिभाजन आणि दुभाजन करण्यात यावे हीच लोक मुंबईच्या जीवावर उठली आहे. दिल्लीश्वर काँग्रेस नेत्यांनामध्ये मुंबई आणि मुंबईकरांबद्दल जो आकस आहे ना तो सदैव असा दिसतोय की त्यांना शिवसेना संपवायची ? त्यामुळे मुंबईचा लचका तोडण्यासाठी शिवसेना तोडायची आहे आणि मुंबई आपल्या अंगठाखाली ठेवायची आहे. आज एकटी मुंबई ही देशात जमा होणार्‍या महसुलात 35 ते 40 टक्के महसूल ही मुंबई देते. मुंबई जर देशाला पोसत असं म्हणणं वावगं ठरणार नाही असंही उध्दव ठाकरे म्हणाले.

close