पैसा,गुंडगिरीच्या जोरावर जिंकण्याचा अजितदादांचा प्रयत्न -मुंडे

February 7, 2012 11:43 AM0 commentsViews: 3

07 फेब्रुवारी

बीडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार पैशंाचा आणि दहशतीचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला. तसेच बीडमध्ये वाढलेली गुंडगिरीमागे सुरेश धस आहेत आणि त्यांना अजित पवारांचे पाठबळ आहे त्यामुळे त्यांची टगेगिरी खपवून घेणार नाही त्यांना जसेच तसे उत्तर देऊ असंही मुंडे म्हणाले. दरम्यान अजित पवारांनी मुंडेंना प्रत्त्युत्तर दिलं आहे. आपल्याकडच्या निवडणुका उत्तर प्रदेश,बिहारमधल्या निवडणुका नाहीत. मुंडेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी असे आरोप करणं योग्य नाही,असा टोला पवारांनी लगावला.

close