शिवसेनेनं 40 हजार कोटी खिशात घातले – राज ठाकरे

February 7, 2012 5:10 PM0 commentsViews: 38

07 फेब्रुवारी

महानगर पालिकेचे 40 हजार कोटी शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कंत्राटदारांनी खिशात घातले आहे असा आरोप करत राज ठाकरे यांनी सेनेवर थेट हल्ला चढवला. तसेच शिवसेना राष्ट्रवादीची छुपी मैत्री आहे असा सनसनाटी आरोपही राज यांनी केला. आयबीए-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी हे आरोप केले.

महानगरपालिकेच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहे. राजकीय पक्षांनी प्रचाराचा नाराळ फोडत आपआपले मतदारसंघ दणाणून सोडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी प्रचाराला सुरुवात करत मुंबईतील अनेक भागात रोड शो घेत रस्त्यावर उतरले आहे. निवडणुकानिमित्त राज ठाकरे यांची आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज यांनी शिवसेनेवर थेट हल्ला चढवला. या मुलाखतीत मुंबई महापालिकेचं 21 हजार कोटी बजेट आहे आणि 65 टक्के हे कर्मचार्‍यांच्या पगारावर खर्च होती आणि आमच्या हातात काही राहत नाही आम्ही करणार तरी काय ? असा दावा शिवसेनेनं केला असा प्रश्न विचारला असता. यावर राज यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. 21 हजार कोटीपैंकी 65 टक्के पगारावर खर्च होतं आहे बरं त्यातून एक आठ हजार कोटी उरले आणि गेल्या पाचवर्षाचा हिशेब पाहिला तर तो आकडा होता 40 हजार कोटी मग प्रश्न असा आहे की हे 40 हजार कोटी गेले कुठे ? ही रक्कम आता दाखवा ? प्रत्येक वेळी सांगायचे की प्रशासनावर खर्च केले तर शहरावर काय केले ? याचा अर्थ स्पष्ट होतो की हे पैसे त्यांच्या नेत्यांच्या आणि कंत्राटदारांच्या खिशात गेले आहे असा थेट आरोप राज यांनी शिवसेनेवर केला.

तसेच शिवसेना 1985 ला सत्तेवर आली तेव्हा हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले. आणि इतक्यावर्षानंतर आता अचानक सगळे हुतात्मे कसे आठवले ? आतापर्यंत इतके सगळे फ्लॉट आरक्षणात काढले तेव्हा नाना शंकर सेठ नाही आठवले आणि निवडणुकांच्या तोंडावर स्मारक बांधत आहे. संयुक्त स्मारक जे बांधण्यात आले त्यासाठी पैसेच मंजूर केले नव्हते तिकडे जिजामाता उद्यानासाठी 10 कोटी मंजूर केले होते ते पैसे स्मारकासाठी वळवले आता जिजामाता उद्यानाने काय करायचे ? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर शिवसेना राष्ट्रवादी यांचे आतून काम सुरु आहे. एक कोंबडी सोन्याचं अंडी देणारी आम्हाला द्या सरकारमध्ये तुम्ही पाहा असं संगळ हे चालू आहे राष्ट्रवादी शिवसेनेला मदतच करते याचे चांगले उदाहरण म्हणजे शिवाजी पार्कवर सभा घेण्यात यावी यासाठी सरकारमधून राष्ट्रवादीने परवानगी देण्यात यावी असं सांगण्यात आलं त्यामुळे त्याना परवानगी मिळाली असा सनसनाटी आरोप देखील राज यांनी केला.

राज ठाकरे यांची संपूर्ण मुलाखत पाहु शकता उद्या दुपारी 1:30 वाजता, संध्याकाळी 6 : 00 वाजता आणि रात्री 10:00 वाजता फक्त आयबीएन लोकमतवर

close