नितिन गडकरींच्या सभेत स्टेज कोसळला

February 7, 2012 5:45 PM0 commentsViews: 3

07 फेब्रुवारी

भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी आज थोडक्यात बचावले. ते आज उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरमधल्या मोहम्मदाबाद इथे प्रचारासाठी गेले होते. या रॅलीत गडकरी ज्या स्टेजवर बसले होते ते स्टेज अचानक कोसळलं. स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यामुळे ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. सभेला सुरुवात झाल्यानंतर काहीवेळातच ही घटना घडली. सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नाही.

close