चंद्रपूर जिल्ह्यात सरकारी कंपनीनं पुरवली बोगस बियाणं

December 16, 2008 7:44 AM0 commentsViews: 3

16 डिसेंबर, चंद्रपूरअन्वर शेखराज्यसरकारच्या मान्यताप्राप्त महाबीजकडूनच बोगस बियाणांचा पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आलाय. आजपर्यंत बोगस नावानं खतविक्री करणार्‍या टोळ्यांमुळे या शेतकर्‍यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. मात्र आता भरोश्याच्या सरकारी कंपनीकडूनच बोगस खतांची विक्री झाली तर पहायचं तरी कोणाकडे ? असा प्रश्न इथल्या शेतकर्‍यांना पडला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरमधले कृष्णा तपासे यांनी आपल्या पाच एकर शेतीत हरभर्‍याचं पिक घेण्यासाठी पंचायत समितीकडून 50 टक्के अनुदानावर मिळणार्‍या महाबीजचं बियाणं खरेदी केलं. पण ऐन पेरणीच्या वेळी बियाणांची बॅग उघडून पाहिलं तर संपूर्ण बियाणं खराब निघालं. बियाणं खराब असल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली तर बियाणे प्रयोग शाळेत पाठवल्याचं अधिकारी सांगतात. पण झालेल्या नुकसानीचं काय ? याबबात बोलण्यास ते तयार नाहीत. इथल्या अनेक शेतकर्‍यांची अवस्था कृष्णा तापसे यांच्यासारखीच झाली आहे.शेतकर्‍यांचा फायदा व्हावा आणि अधिकाधिक चांगलं बियाणं शेतकर्‍यांना उपलब्ध व्हावं, यासाठी महाबीज योजना राबवली जाते. आजपर्यंत शेतकर्‍यांनी या बियाणांवर विश्वास ठेवला, पण त्यातही भ्रष्टाचार झाल्याचं आता स्पष्ट झालंय.

close