मुंडेंचं घर इतर पक्षातील लोकांनी फोडले – गडकरी

February 9, 2012 6:17 PM0 commentsViews: 5

09 फेब्रुवारी

सध्या महाराष्ट्रात निवडणुकीसाठी काय चाललं आहे याची मला माहिती नाही, आणि मोक्का खाली अनिल धावडे या गुंडाला दिलेल्या उमेदवारीबद्दल मला काही माहिती नाही त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना त्याचे अधिकार दिले आहे असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच धनजंय मुंडे यांनी आमदारकी गोपीनाथ मुंडे यांच्या म्हणण्यावर दिली होती, असा खुलासा करत धनंजय यांच्या बंडावर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतली असं सांगून गडकरींनी हात झटकले.त्याच बरोबर मी कधी कुणाची घर फोडाली नाही असंही गडकरी म्हणाले. आमचे सीनिअर करस्पाँडंट अमेय तिरोडकर यांना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

close