मतदारराजा रंगला पार्ट्यात, फिरतोय नॅनोत !

February 10, 2012 1:20 PM0 commentsViews: 30

अलका धुपकर, मुंबई

10 फेब्रुवारी

प्रचारामध्ये पेड कॅम्पेनर उतरवले जातायत, आणि गर्दी खेचली जाते. हा पेड महिमा इथचं थांबत नाही. तर चक्क मतांसाठीही मॅनेजमेंटही केली जात आहे. आचारसंहितेमधून पळवाट काढत मतदारांना वश करण्याचे अनेक उपाय उमेदवार अवलंबताना दिसतायत. आणि मतदार राजादेखील या प्रलोभनांना बळी पडतोय.

भ्रष्टाचाराचे धनी नेहमीच राजकारणी होतात.पण, मतदार राजाही भ्रष्टाचाराच्या पापामध्ये वाटेकरी बनल्याचं चित्र दिसायला लागलं आहे. निवडणुकीचे काऊंटडाऊन जसजसं जवळ येतंय तसं गृहपयोगी वस्तूंपासून ते नॅनोपर्यंत अनेक वस्तू मतदारांना घरपोच दिल्या जात आहे. कुठे जेवणावळी झडतायत तर कुठे पिकनिकचे दावे केले जात आहे. पेड वोट मॅनेजमेंटची ही यादी अजूनही बरीच मोठी आहे. राजकारण्यांच्या नावाने बोटं मोडणारे काही मतदार निवडणुकीत मिळणारे फायदे लाटून घेतात. निवडणूक आयोगाला गुंगारा दिल्याच्या आनंदात उमेदवार आहेत, मिळणार्‍या गिफ्टसवर मतदारही खूष आहेत. पण, यात हसू होतंय ते लोकशाहीचं..

'पेड व्होट'ची मॅनेजमेंट

- पैठणीचं वाटप- लकी ड्रॉमधून वस्तूंचं वाटप- मटन, चिकन, दारूच्या पार्ट्या- किमती साड्यांचे मोफत वाटप- हळदीकुंकू, सत्यनारायणाची पूजा, भंडार्‍याचे आयोजन- शिर्डी, गोवा पर्यटन- वॉर्डातल्या मंदिरांना निधीचं दान- व्यायामशाळा केल्या बळकट- डीटीएचचं मोफत वाटप- सोसायटीमधल्या सर्व फ्लॅट्सना रंगरंगोटी- फ्लॅट्समध्ये नव्या टाईल्स- वॉर्डात पेव्हर ब्लॉकची कामं- मोफत वैद्यकीय शिबिरं-भरघोस बक्षिसांच्या चित्रकला, रांगोळी स्पर्धा – तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा

close