ठाकरे कुटुंबीयांनी संपत्ती जाहीर करावी – राणे

February 10, 2012 5:19 PM0 commentsViews: 12

10 फेब्रुवारी

शिवसेनेनं मुंबई बकाल करुन दाखवली आहे, मुंबईकरांचे शोषण आणि त्यांच्या पैशावर भ्रष्टाचार केला त्यांची घोषणाच बोगस आहे अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली. तसेच गेल्या सत्तरा वर्षापासून काम केली आहे ती सांगावी वीस वर्षापुर्वी उध्दव ठाकरे यांच्याकडे काय होते आणि आज काय आहे ठाकरेंनी आपली संपत्ती जाहीर करावी असं आव्हान नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना केलं आहे. त्याचबरोबर शिवसेना आता ओरिजन्ल राहिली नाही त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे असा टोलाही लगावला. महायुतीही कागदावरच आहे शिवसेनेच्या ध्येयधोरणात रामदास आठवले फिट बसणार नाही त्यामुळे आठवले यांनी सोबत जाऊन एका प्रकारे राजकीय आत्महत्या केली आहे असं मतही राणेंनी व्यक्त केलं. येत्या महापालिकेच्या निवडणुकीत आघाडीचे सरकारच येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नारायण राणे यांनी आयबीएन लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलत होते.

close