अजित पवार यांची मुलाखत

February 10, 2012 5:22 PM0 commentsViews: 32

10 फेब्रुवारीशिवसेनेनं मुंबईमध्ये गेल्या 16 वर्षात प्रचंड भ्रष्टाचार करुन दाखवला आहे. त्यांच्या घरातून बाहेर पडलेले राज ठाकरे यांनीही सेनेनं 40 हजार कोटींची घोटाळा केल्याचा आरोप केला आहे यावरुन महापालिकेत 100 टक्के भ्रष्टाचार होतो अशी टीका अजित पवार यांनी केली. तसेच आणखी काही खासदार संपर्कात आहे असाही गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत अजितदादांनी सेनेवर तोफ डागली.

मुंबई महापालिका निवडणुकींला काही दिवस शिल्लक राहीले आहे. तर दुसरीकडे नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचा तोफा डागायला सुरूवात झाली आहे. शिवसेनेनं करुन दाखवलं ! या मोहिमेवर अजित पवारांनी कडाडून टीका केली. शिवसेनेनं मुंबईचं वाटोळं करुन दाखवलं आहे. गेल्या 16 वर्षाच्या सत्तेवर असताना सेनेनं गैरवापर करत अनेक योजनामध्ये घोटाळा केला आहे. त्यांच्याच घरातून बाहेर पडलेले राज ठाकरे यांनी वेगळी चूल मांडली पण अलीकडेच त्यांनी आपल्याच चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेनं 40 हजार कोटींचा घोटाळा केला आहे असा आरोप केला आहे. स्थायी समितीत कोणते निर्णय घेतले जातात आणि काय अंमलबजावणी होते हे लक्षात न येण्यासारखच आहे. वॉटर मिटरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोपही अजितदादांनी केला. तसेच शिवनेनेचे इंजिनिअर असलेले खासदार राष्ट्रवादीत येतात. शिवसेनेचे कित्येक खासदार आमच्या संपर्कात येतात आणि नेतृत्वावर नाराजी व्यक्त करतात सेनेनं आत्मपरिक्षण करावे असा सल्लाही अजितदादांनी दिला.

close