सत्तेसाठी शिवसेना-राष्ट्रवादीकडून सोयीचं राजकारण – राज

February 11, 2012 6:05 PM0 commentsViews: 13

11 फेब्रुवारी

सत्तेसाठी शिवसेना-राष्ट्रवादीकडून सोयीचं राजकारण केलं जातंय अशा शब्दात राज ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि शिवेसेनेच्या पुणे पॅटर्नवर खरमरीत टीका केली. भ्रष्टाचार करून तुरुंगात जाणार्‍यांचं स्वागत होतंय, असं म्हणत त्यांनी सुरेश कलमाडींवर तोफ डागली. आघाडीच्या हातात राज्याची सत्ता आहे, मग शहरांचा विकास का रखडलाय असा सवालही त्यांनी विचारला. विकास कसा असतो हे गुजरातमध्ये जाऊन पाहा, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींचंही कौतुक केलं. आपल्या मुख्यमंत्र्यांनी,उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांच्या क्लासेस घ्यावे असा टोला ही राज यांनी लगावला.तसेच सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे यामागे टक्काचे गणित आहे. जर वाहतूक सुधारु दिली नाही तर राहुल बजाज सारख्या वाहन उत्पादक मालकांना नफा कसा मिळणार यासाठी सगळा खटाटोप चालला आहे असा आरोपही राज यांनी केला. त्याचबरोबर पूर्ण सत्ता हाती द्या कसे काम करायचे आहे ते करुन दाखवतो पण हे सगळे पाच वर्षात होणार नाही हा 50 वर्षाचा बॅकलॉग भरुन काढवा लागणार आहे असंही राज म्हणाले. राज ठाकरे यांची पुण्यात सभा झाली. या सभेलाही पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

close