‘ कॅलिफेस्ट ‘ मध्ये अच्युत पालव यांची अक्षरचित्रं

December 16, 2008 8:26 AM0 commentsViews: 13

16 डिसेंबर, मुंबई शिल्पा गाड तरुणांना असणारं कॅलिग्राफी या कलेचं आकर्षण पाहता मुंबईत ' कॅलिफेस्ट ' हे प्रदर्शन भरलं आहे. हे प्रदर्शन सुप्रसिद्ध कॅलिओग्राफर अच्युत पालव आणि ऊर्जा या संस्थेनं भरवलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन शिवसेनेचे कार्याध्यक्ष आणि जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता, कला दिग्दर्शक नितीन देसाई , ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष, कला संचनालयाचे संचालक रवीन्द्र बाळापुरे यांच्यासह अनेक कलारसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.कॅलिग्रॅफी हा शब्द तयार झाला तो ग्रीक शब्द ' कॅलोस 'पासून. ' कॅलोस ' म्हणजे सुंदर आणि ' ग्रॅफी ' म्हणजे लेखन. भारतात कॅलिग्रॅफी ही कला आली ती सम्राट अशोकाच्या काळात . शाईच्या पेनानं केलेली कॅलिग्रॅफी हे भारतीय कॅलिग्रॅफीचं वैशिष्ट . कागदापासून ते कपड्यांवरच्या कॅलिग्राफीचा आधुनिक प्रवास ' कॅलिफेस्ट ' या प्रदर्शनात मांडण्यात आला आहे. " मला हे प्रदर्शन बघून समाधान वाटलं. या ' कॅलिफेस्ट 'च्या निमित्ताने अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. आम्ही त्यावेळेस मी फोटोग्राफी आणि चित्ररंगवण्यात मग्न असायचो. पण माझा मित्र अच्युत मात्र तासन्‌तास अक्षरं गिरवत बसायचा. आता अच्युतने सुलेखनात म्हणेजच कॅलिग्राफीत अशी काही हुकमवत मिळवली आहे की, त्याचं प्रदर्शन पाहताना मला स्वत :ला दोन तास लागले, " असं बोलत उद्धव ठाकरे भूतकाळात रमले. " काला ही लोकाभिमुख असली पाहिजे. तिच्यातून सर्वसामान्यमाणसाची नाळ जोडली पाहिजे. अच्युतने ते कॅलिग्राफीमधून उत्तमरित्या साधलं आहे. सुलेखनकार आर. के . जोशींनी ' कॅलिग्राफी ' च्या विकासासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. तोच वारसा अच्युत पुढे नेण्यात यशस्वीपणे नेत आहे, असं विजया मेहता म्हणाल्या. आमचा उद्देशच हा होता की सर्वसामान्य माणसांपर्यंत ही कॅलिग्रॅफीची कला पोहोचावी म्हणून ' कॅलिफेस्ट ' प्रदर्शन भरवलं असल्याची माहिती सुलेखनकार अच्युत पालव यांनी दिली आहे. ' कॅलिफेस्ट ' मध्ये फक्त कॅलिग्रॅफीचं प्रदर्शन नाहीये तर कॅलिग्रॅफीवरची लेक्चर, वर्कशॉप्सही होणार आहेत. 21 डिसेंबरपर्यंत सकाळी 10. 30 ते संध्याकाळी 5. 30 या वेळेत जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये ' कॅलिफेस्ट ' बघता येईल.

close