गोपीनाथ मुंडे आणि अजित पवार यांच्यात कलगीतुरा

February 13, 2012 10:38 AM0 commentsViews: 9

13 फेब्रुवारी

गोपीनाथ मुंडे आणि अजित पवार यांच्यातला कलगीतुरा सुरूच आहे. काल जाहीर सभेत मुंडेंनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली होती. आज पुण्यात पत्रकार परिषदेतही त्यांनी अजित पवारांवर हल्ला चढवला. गुंडांना तिकीट देतात आणि त्यांना सुधारण्याची संधी द्या असं अजित पवार म्हणतात, तर शरद पवार म्हणतात अजित पवारांना सुधारण्याची संधी द्या नेमकं काय चाललं आहे असं गोपीनाथ मुंडे म्हणाले. तर मुंडेंच्या घरातच फूट पडली आहे त्यामुळे ते द्वेषापोटी ते मानसिक संतुलन ढळल्यासारखे वागत आहे असा थेट हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला.

close