राज यांनी नाशकात निवडणूक लढवून दाखवावी – भुजबळ

February 13, 2012 5:56 PM0 commentsViews: 52

13 फेब्रुवारी

नाशिकमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक मनसेचे तडीपार आहे. आमच्यावर कसले आरोप करतात जर हिंमत असेल तर इंथ येऊन निवडणूक लढवून दाखवा, पाठ लावल्याशिवाय राहणार नाही असं जाहीर आव्हान छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांना दिले. तसेच तेलगीप्रकरणात भुजबळांचे संबंध असल्याचा आरोप करणार्‍या राज ठाकरेंना त्यांनी किणी हत्या प्रकरणाची आठवण करुन दिली.

काल नाशिकमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी राज यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. वाढलेल्या गुन्हेगारीला भुजबळ जबाबदार आहे. गुन्हेगारांच्या तडीपारी रद्द करण्यासाठी भुजबळ खमक्या अधिकारी आणत नाही तसेच तेलगी प्रकरणाशी भुजबळ यांचा संबंध होता असा गंभीर आरोपही राज यांनी केला होता. राज यांच्या आरोपाचा समाचार घेत छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली. काय नक्कला करतात, कोणावर बोलतात याचे तरी भान आहे का ? हल्ली काम वाढलं आहे त्यामुळे रात्रीच्या पाटर्‌याही वाढल्या असेल बहुतेक रात्रीची उतरली नसेल म्हणून असे बरगाळत असेल. इतक्याच जर चांगल्या नक्कला करत असेल तर पुढच्या नाशिक फेस्टीव्हलमध्ये बोलवा असा टोला भुजबळ यांनी लगावला. तसेच सगळ्यात जास्त तडीपार हे मनसेचे नगरसेवक आहे असा पुरावनिशी दाखला भुजबळांनी दिला. तसेच तेलगीप्रकरणात भुजबळांचे संबंध असल्याचा आरोप राज यांना केला होता यावेळी भुजबळ यांनी किणी हत्या प्रकरणाला 20 वर्षांनंतरही वाचा फुटू शकते अशा इशाराही राज यांनी दिला.

close