पाकविरुद्ध लष्करी कारवाई नाही- ए. के. अ‍ॅन्टोनी

December 16, 2008 9:46 AM0 commentsViews: 1

16 डिसेंबर, दिल्ली भारताची पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याची योजना नाही. मात्र पाकने अतिरेक्यांविरूध्द ठोस कारवाई केली तरच दोन्ही देशांतले संबंध सुधारतील असं संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी स्पष्ट केलं. ते दिल्लीत बोलले होते "जोवर पाकिस्तान त्यांच्या भूमीवरून होणार्‍या दहशतवादी कारवायांवर लगाम घालत नाही, तोपर्यंत आम्ही आमचं पुढचं पाऊल सांगू शकत नाही" असं ते म्हणाले.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध प्रचंड ताणले गेले होते. या हल्ल्याला जबाबदार असणार्‍या दहशतवाद्यांना भारताकडे सोपवण्यास पाकिस्ताननं नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानवर लष्करी कारवाई करेल का ? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय.

close