मुख्यमंत्र्यांना राणेंचा गुण नाही पण वाण लागला – अजितदादा

February 14, 2012 4:47 PM0 commentsViews: 3

14 फेब्रुवारी

कुणाच्याही दादागिरीला पिंपरी-चिंचडवकरांनी घाबरू नये, असं मुख्यमंत्र्यांनी काल पिंपरीत म्हटलं होतं. स्वतःला प्रमुख म्हणवता मग गुन्हेगारांवर कारवाई का करत नाही असा खडा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारला. तसेच मुख्यमंत्र्यांना राणेंचा गुण नाही पण वाण लागला असा टोलाही लगावला. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

close