उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर आनंदच – पवार

February 16, 2012 8:28 AM0 commentsViews: 7

15 फेब्रुवारी

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले तर मला आनंदच होईल. पण त्यासाठी मी उद्धवला सल्ला देण्याच्या भानगडीत पडणार नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.आयबीएन लोकमतच्या खास मुलाखतीत त्यांनी हे मत मांडलं.तसेच 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी पुन्हा आघाडी करेल असंही शरद पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

close