कसाबला बचावाचा अधिकार – राम जेठमलानी

December 16, 2008 10:26 AM0 commentsViews: 1

16 डिसेंबर मुंबईवर हल्ला करणारा आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात असणारा अतिरेकी अजमल कसाब याच्या वकीलपत्रावरून सध्या वाद सुरू आहे. मात्र भारतीय राज्यघटनेनुसार कसाबला स्वत:चा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी म्हटलंय. "कसाबच्या वकीलपत्रावरून वाद असू शकतील, पण जर स्वत:च्या बचावाचा कसाबचा हक्क नाकारला तर ते घटनेच्या विरोधी असेल" असं ते म्हणाले.कसाबचं वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवल्याबद्दल अ‍ॅ. अशोक सरोगी यांच्याविरुद्ध शिवसेनेनं आंदोलन छेडलं होतं. याच कारणावरून अमरावतीत. महेश देशमुख यांच्या घराची शिवसैनिकांनी तोडफोड केली होती. यानंतर घटनेनं दिलेला बचावाचा अधिकार कसाबला मिळणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जेठमलानी यांचं वक्तव्य सूचक मानलं जात आहे.

close