बोगस मतदानाच्या संशयावरून तरुणांना मारहाण

February 16, 2012 11:45 AM0 commentsViews: 7

16 फेब्रुवारी

पुण्यात बोगस मतदार असल्याच्या संशयावरून किश्किंदा भागातील मतदान केद्रावर चांगलाच गदारोळ उडाला. सांगली जिल्हाचे रजिस्ट्रेशनन असलेल्या गाडीतून काही तरुण प्रभाग 27 इथल्या मतदार केंद्रावर मतदानासाठी आले. युतीचे उमेदवार आणि काही अपक्षांनी त्यांच्याकडे ओळखपत्र मागीतले. मात्र या तरुणांकडे केवळ मतदार ओळखपत्र होतं. स्थानिक रहिवासी असल्याचे दाखले त्यांच्याकडे नव्हते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या उमेदवारांनी या तरुणांना मारहाण केली. मारहाणीनंतर या सर्वांना पोलिसांच्या हवाली करण्यात आली.

close