ड्रीम ट्रेन मोनोरेलची यशस्वी चाचणी

February 18, 2012 11:05 AM0 commentsViews: 3

18 फेब्रुवारी

मुंबईकरांची ड्रीम ट्रेन असलेल्या देशातल्या पहिल्या मोनोरेलची चाचणी आज सकाळी 10 वाजता मुंबईतल्या वडाळा इथल्या मोनोरेल कार डेपोमध्ये घेण्यात आली. या चाचणीमध्ये वडाळा कार डेपो ते भक्ती पार्क या मोनोरेलच्या पहिल्या स्टेशनपर्यंत एक किलोमिटरची ही चाचणी घेण्यात आली. या वर्षा अखेर मोनोरेलचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. हा पहिला टप्पा वडाळा कार डेपो ते चेंबूर असा 10 किमीचा आहे. यात 12 स्टेशन्स आहेत. मोनोरेलच्या दोन टप्प्यांना अंदाजे 2400 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

close