राज ठाकरेंविरुद्ध अजामीनपात्र वाँरट

December 16, 2008 12:00 PM0 commentsViews: 6

16 डिसेंबर, दिल्ली राज ठाकरेंवर जमशेदपूरमधील कोर्टानं आज आणखी एक अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. सुनावणीसाठी उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी, अशा आशयाची राज ठाकरेंची याचिका कोर्टानं फेटाळून लावली. 13 मार्च 2007 मध्ये राज यांनी मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये केलेल्या भाषणात उत्तर भारतीयांवर टीका केली होती. त्यासंदर्भात ही केस सुरू आहे. मुंबईच्या पोलीस कमिशनर यांनी राज ठाकरे यांना 16 जानेवारीपर्यंत जमशेदपूरमधील कोर्टात हजर करावे, असा आदेश न्यायाधीश अनिल कुमार यांनी दिलाय. दरम्यान राज यांच्याविरुद्ध जमशेदपूरमधल्याच दुसर्‍या एका कोर्टानं याआधीच एक अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. छठपूजेसंदर्भात राज यांनी केलेल्या विधानाबाबतच्या या केसमध्ये मनसे प्रमुखांना 18 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर व्हावं लागणार आहे.

close