‘चिमुकल्या चोचीमध्ये ज्ञानभंडाराचे गाणे’

February 26, 2012 2:52 PM0 commentsViews: 44

पंकज क्षिरसागर, परभणी

26 फेब्रुवारी

परभणी जिल्ह्यातील हदगाव नखाते या गावात सध्या चर्चा आहे ती 4 वर्षाच्या वैष्णवी नावाच्या चिमुरडीची…वैष्णवीची खासियत आहे तिची स्मरणशक्ती.. कुठल्याही प्रश्नाचं पटकन आणि अचूक उत्तर देणारी वैष्णवी, चाचा चौधरीप्रमाणे कॉम्प्युटर से भी तेज आहे.

चटाचटा उत्तर देणारी वैष्णवी अवघ्या 4 वर्षांची आहे. अंगणवाडीत शिकणार्‍या वैष्णवीच्या या हुशारीनं सगळेचं चकीत झाले आहे. एकदा ऐकलेली कुठलीही गोष्ट हिच्या लक्षात राहते आणि म्हणूनच ती परभणीत आश्चर्याचा आणि कौतुकाचा विषय झाली. वैष्णवीचे वडिल हदगाव नखाते या परभणी जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात टेलर आहेत. वैष्णवीच्या हुशारीवर ते खूष आहेत. पण त्यांना तिच्या पुढच्या शिक्षणाची चिंता सतावतं आहे.चार वर्षांच्या या चिमुरडीला डॉक्टर व्हायचं आहे. तिची अफाट स्मरणशक्ती पाहता.. तिला संधी आणि मदत मिळाली. तर तिचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.

close