अण्णांच्या आंदोलनावर पत्रकार आशुतोष यांचे पुस्तक

February 25, 2012 4:48 PM0 commentsViews: 6

25 फेब्रुवारी

प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला धक्के देणार्‍या अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने 2011 वर्षं गाजवलं. जनतेचा लोकशाहीतला आवाज बुलंद केला. त्यामुळेच, या आंदोलनाचे आता सखोल विश्लेषण सुरू झालं आहे. आयबीएन 7 चे मॅनेजमेंट एडीटर आणि ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांनी याच आंदोलनावर पुस्तक लिहीलं आहे.

2011 वर्षातली ही सगळ्यात मोठ्ठी बातमी…अण्णांचं देशभर उभं राहीलेलं…भ्रष्टाचार विरोधी आंदोलन…संवेदनशील पत्रकार ही घटना नेमकी कशी बघतो. मुजोर सत्तेच्या विरोधातली ही सामान्य लोकांची लढाई नेमकी कशी होती. याचीच गोष्ट सांगत आहेत आशुतोष. 'अण्णा 13 डेज दॅट अवेकन इंडिया' या पुस्तकातून..संपादक आशुतोष म्हणतात, "पिछले साल में लोगोने देखा था कि कैसे भ्रष्टाचार के एक एक मामले बाहर आ रहे है. और उसके खिलाफही लोगोंकी ये आंदोलन एक आवाज थी"आशुतोष आयबीएन 7 या हिंदी न्यूज चॅनेलचे संपादक आहेत. पत्रकार असल्यामुळे त्यांची शैलीही ओघवती आहे. रामलीला असो किंवा मुंबईतील एमएमआरडीए इथल्या आंदोलनाच्या जीवावर संसदेत एक राजकारणही सुरू होतं. या राजकारणाचंही सविस्तर वर्णन आशुतोष यांनी केलं आहे.

आशुतोष म्हणतात, "तीन तरह की राजनिती चल रही थी…. "

या आंदोलनाच्या नेतृत्वाकडून झालेल्या चुकाही स्पष्ट शब्दांत आशुतोष लिहीतात. पण, चुका झाल्या असल्या तरीही हे आंदोलन संपलेलं नाही असंही आशुतोष यांचं मत आहे. ते का संपलेलं नाही हे जाणून घ्यायचं असेल तर, हे पुस्तक वाचयलाच हवं.

close