जुन्या मुंबईच्या गोष्टी आता पुस्तकात !

February 26, 2012 3:34 PM0 commentsViews: 83

शची मराठे, मुंबई

26 फेब्रुवारी

मुंबईकरांसाठी 'मुंबई म्हणजे जीव की प्राण' जुन्या मुंबईकरांना भूतकाळात गेलेल्या मुंबईतल्या अनेक जागा, वास्तू आठवत असतील. तर नव्या मुंबईकरांना नव्या ठिकाणांमागचा इतिहास माहित नसेल. आता या दोन्ही नव्या आणि जुन्या मुंबईकरांना खरी मुंबई पहाता येणारे एका पुस्तकाच्या माध्यमातून.

गिरगावातील सेंट्रल प्लाझा थिएटर…प्रभातचा संत तुकाराम पहिल्यांदा याच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. क्रॉफर्ट मार्केटजवळचं हे सरदार गृह…लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्वास याच वास्तूत घेतला. क्रॉफर्ट मार्केट, या मार्केटव्यतिरिक्त मुंबईत बरेचं बाजार होते. मुंबईतल्या अशा अनेक जागा आता हरवल्यात आणि हीच हरवलेली मुंबई अरुण पुराणिक यांनी आपल्या हरवेली मुंबई या पुस्तकातून दाखवली आहे.

अभ्यासक – लेखक अरुण पुराणिक म्हणतात,माझा जन्म गिरगावचा…घरी जागा कमी आणि त्यामुळे सगळे बालपण हे बाहेरचं गेलं. 6-7 वर्षांपासून मी फिरायचो..ट्रामनं खूप मौज वाटायची मला आणि मग मला वाटलं की यासगळ्या बद्दल लिहलं पाहिजे.

गिरणगाव, क्षुधाशांती गृह, पोसखाने अशी 16 प्रकरणं आणि 250 फोटोंमधून ही 'हरवलेली मुंबई' आपल्यासमोर उलगडत जाते. हा आपण आत्ता उभे आहोत हा गिरगावचा नाका आहे. इथे सेंट्रल सिनेमा, हे व्हाईसरॉय हॉटेल, मग तेव्हाच्या व्हॉईसरॉयनं ऑब्जेक्शन घेतलं आणि मग त्याचं नाव झालं व्हॉईस ऑफ इंडिया आणि तू आत्ता उभी आहेस तिथून कोकणात जायला बसेस सुटायच्या सकाळी खूप धावपळ असायची इथे.

ऍलेकझांड्रीया सिनेमा, सरदार गृह, खटाव चाळ अशा कोणेएकेकाळी मुंबईच्या 'लॅन्डमार्क'असलेल्या या जागा..आता काळाच्या ओघात लुप्त झाल्यात पुस्तक पहाताना, वाचताना त्या काळात जाता येईल एवढाच या पुस्तकाचा उद्देश. हे पुस्तक वाचल्यावर मुंबईच्या आठवणीने नॉस्टॅलेजिक व्हायला होतं पण इतकचं नाही तर हे पुस्तकं म्हणजे अहोरात्र धावणार्‍या मुंबईचा चेहरा दाखवणारा दस्तावेजदेखील आहे

close