नागपूरमध्ये बसपाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा राडा

February 27, 2012 2:26 PM0 commentsViews: 2

27 फेब्रुवारी

नागपूर येथील इंदोर्‍यामध्ये बहुजन समाज पक्षाच्यावतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम होता. पण कार्यक्रम सुरु असताना अचानक काही काही असंतुष्ट कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रम उधळून लावला. कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाही. थेट स्टेज गाठत प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांना धक्काबुक्की केली. सुरुक्षा कर्मचार्‍यांनी वेळीत हस्तक्षेप करुन राडा थांबवला.

close