सुरक्षेपेक्षा बिल्डरांकडे विलासरावांचं लक्ष होतं- राणे

December 16, 2008 12:07 PM0 commentsViews: 1

16 डिसेंबर, नागपूरमाजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या गैरहजरीत नारायण राणे यांनी त्यांच्यावर विधानसभेत टीका केली. विलासराव देशमुखांचं लक्ष सुरक्षाव्यवस्थेवर नव्हतं. म्हाडा, एमएमआरडीए या खात्यांकडेच जास्त होतं, अशी टीका राणे यांनी केली. सुरक्षेपेक्षा बिल्डरांकडे विलासरावांनी जास्त लक्ष दिलं, असा राणे यांचा अप्रत्यक्ष आरोप होता.विलासराव देशमुख आजही नागपूरात विधीमंडळ अधिवेशनात आले नाहीत. काही दिवसांपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री असलेले देशमुख विधानसभेत शोक प्रस्तावाला गैरहजर होतेच पण आज मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या चर्चेत भाग घेण्याचं त्यांनी टाळलं. विलासराव देशमुख यांच्या गैरहजेरीची चर्चा नागपूरात आहे.

close