खडकवासला धरणातील मगर जाळ्यात

February 28, 2012 4:59 PM0 commentsViews: 37

28 फेब्रुवारी

गेले वर्षभर पुण्यातील खडकवासला धरणात मगर दिसून आल्यानंतर नदीकाठचे शेतकरी घाबरले होते. एन.डी.ए चा सराव ही मगरीच्या वास्तव्यामुळे बाधीत झाला होता ती मगर अखेर जाळ्यात सापडली सोमवारी रात्री खडकवासला धरणाच्या कालव्यात एका शेतकर्‍याला मगर दिसली. वनविभागाचे कर्मचारी कात्रज सर्पोद्यानाचे कर्मचारी तसेच फायर ब्रिगेडचे कर्मचारी या सर्वांनी मगरीचा शोध सुरू केला. पहाटेपर्यंत मगरीचा शोध लागला नाही मग मंगळवारी सकाळी या कालव्यातील पाणी बंद करून शोधमोहीम सुरू झाली. दुपारी अखेर मगर जाळ्यात सापडली .

close