या नाटकात ‘हिरो आजोबा, हिरोईन आजी’ !

March 1, 2012 1:56 PM0 commentsViews: 61

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड

01 फेब्रुवारी

आयुष्यभर कष्ट केल्यानंतर म्हातारपणी मिळालेल्या विसाव्यात जर छंद जोपासायला मिळाला तर? त्याचा आनंद अवर्णनीयच असेल. पिंपरीतला 'रुपेरी कडा' हा ग्रुप सध्या हेच अनुभवत आहे. 60 ते 85 वर्षांच्या या आजी-आजोबांनी एक रोमँटिक नाटक बसवलंय. 25 मार्च तारखेला हे नाटक ते सादर करणार आहेत.

काय करायचं म्हातारपणी ? या प्रश्नावर पिंपरीतल्या या तरूणांनी तरी उत्तर शोधलंय. हे सगळे तरूण आहेत 60 ते 85 या वयोगटातील..या सगळ्यांनी मिळून एक मस्त रोमँटीक संगीत नाटक बसवलंय. आणि तरूणांनाही लाजवेल अशा उत्साहात त्याची प्रॅक्टीसही सुरू आहे.

'तुझ्याचसाठी' या तीन अंकी नाटकाची गेला महिनाभर हे सगळेजण प्रॅक्टीस करत आहे. आयुष्यातील सेकंड इनिंग सुरू झाल्यानंतर यंगस्टर्सचं आयुष्य, त्यांचं प्रेम, त्यांचं प्लर्टिंग हे सगळं हे लोक अभिनयातून मस्त एन्जॉय करत आहे. म्हातारपणी कुढत बसणारे अनेकजण आहेत. पण काही राहून गेल्याची खंत नको रहायला असं म्हणत आयुष्याच्या संध्याकाळी रुपेरी कडा शोधणारे हे सगळेजण एकच संदेश देतायेत ते म्हणजे हे जीवन सुंदर आहे.

close