मालेगाव स्फोट : अजय राहिरकरला कोठडी

December 16, 2008 12:11 PM0 commentsViews: 5

16 डिसेंबर, मुंबई मालेगाव स्फोट प्रकरणातला आरोपी अजय राहिरकरला मोक्का कोर्टानं 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. तर इतर 8 जणांना 29 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.दरम्यान, नांदेड बॉम्बस्फोटातील आरोपी राकेश धावडे याला नांदेड नगर दिवाणी कोर्टानं 21 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी दिलीय. नांदेड स्फोटाप्रकरणी न्यायालयानं आज दुसर्‍यांदा राकेश धावडेला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. याआधी नांदेड न्यायालयाने 16 डिसेंबरपर्यंत राकेशला पोलीस कोठडी दिलेली होती. आजही राकेशची रवानगी सीबाआय कोठडीत केली असून त्याच्या नार्को टेस्टला परवानगी देण्यात आली आहे. या स्फोटाप्रकरणी राकेश धावडेकडून सीबीआयला काही महत्त्वाचे पुरावे मिळालेअसल्याचं समजतंय.

close