पाणीकपाती विरोधात मनसेचं अनोख आंदोलन

March 2, 2012 2:55 PM0 commentsViews: 1

02 फेब्रुवारी

पुण्यात पाणीकपाती विरोधात आज मनसेनं पाणी पुरवठा कार्यालयात मनसेनं ठिय्या आंदोलन केलं. तसेच महापालिकेच्या अधिक्षक अभियंत्यावर पाणी ओतून मनसेनं आपला निषेध नोंदवला. पुण्याच पाणी लवासाला जात असल्याचा आरोपही मनसे कार्यकर्त्यांनी केला. पाण्याच्या नियोजनात कोणतीही चूक झालेली नसल्याचा दावा पुणे महापालिकेनं केला होता. धरणांमध्ये पुरेसा पाणी पुरवठा नसल्याने पाऊस सुरु होईपर्यंत पाणी पुरावं यासाठीच ही पाणीकपात लागु केल्याचं पालिकेचं म्हणणं होतं. या विरोधात मनसेनं आपला निषेध नोंदवला.

close