दिलीप प्रभावळकर ‘चिमणराव ते बापू’ !

March 5, 2012 5:42 PM0 commentsViews: 44

05 मार्च

दिलीप प्रभावळकरांचा चिमणराव पासून, 'लगे रहो मुन्ना भाई'च्या गांधींपर्यंतचा सगळा प्रवास आता उलगडला. निमित्त होतं ते बाबा आमटेंच्या आनंदवनाला मदत उभारण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमाचं. वेदनेशी नातं जोडलेल्या आनंदवनाच्या मदतीसाठी आमटे कुटुंबीय शाश्वत निधी उभारत आहे. त्यासाठी काल दिलीप प्रभावळकरांच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रभावळकरांच्या आजपर्यंतच्या अनेक भुमिका, त्यातलं मर्म आणि त्याबरोबरच या भुमिकांसाठी त्यांनी घेतलेले कष्ट हा सगळा प्रवास उलगडला गेला.

close