झेडपीच्या शाळेला आधुनिक बनवणार्‍या वंदना मॅडम !

March 7, 2012 4:28 PM0 commentsViews: 13

पंकज क्षीरसागर, परभणी

07 मार्च

तुम्हाला परभणीत जाण्याचा योग आला, तर तिथल्या झरी गावातली झेडपीची शाळा जरुर पहा… एका पडक्या, उदासवाण्या शाळेचं, उत्साही आणि आधुनिक रुप आश्चर्यचकित करुन टाकतं. आणि या मागे सगळी मेहनत आहे, ती एका धडाडीच्या महिलेची.

झकास कॉम्प्युटर लॅब…भरभक्कम प्रयोगशाळा आणि उल्हसित मुलं..परभणीमधल्या झरीच्या जिल्हा परिषद शाळेतील हे दृश्य..शिस्त आणि गुणवत्ता तर खासगी शाळांनाही लाजवणारी… हे सगळं घडलं केवळ सकारात्मक विचारसरणीमुळे..आधीची अवस्था बघाल तर ती होती अशी बकाल.शाळेला हेडमास्तर नाही, धड वर्ग नाहीत आणि मुलांमध्ये वाढलेली बेशिस्त. उपशिक्षणाधिकारी असलेल्या वंदना फुटाणेंना राहवलं नाही. मग त्याच या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका झाल्या आणि बघता बघता झरीमध्ये ज्ञानार्जनाचं हे नंदनवन फुललं.

वंदना फुटाणेंची धडाडीही अशी की, शिक्षक, गावकरी, मुलांचे पालक आणि दानशूर व्यापारी. या सगळ्यांकडून त्यांनी अगदी सहजतेनं मदत मिळवली आणि अशी शाळा घडवली.

झरीच्या गावकर्‍यांना आता शाळेचा अभिमान वाटतोय. आपुलकीनं उभी केलेली इमारत…दर्जेदार साहित्य..उत्साहित करणारी रंगसंगती आणि शिस्तीचं गमभन..झेडपीच्या शाळेचं हे आनंद देणारं आधुनिक रुप..वंदनाताईंच्या प्रयत्नामुंळेच आता झरीच्या मुलांना नुसतं शाळेतं जावस वाटतं, असं नाही, तर तिथं रहावसंही वाटतंय.

close