फरार गुन्हागार हसन अली पोलिसांना शरण

December 16, 2008 4:29 AM0 commentsViews: 2

16 डिसेंबरगेल्या काही महिन्यांपासुन पोलिसांनी फरारी घोषित केलेला पुण्याचा घोडे व्यापारी हसन अली अखेर भोईवाडा कोर्टात शरण आला. महाराष्ट्रासह सात राज्यातल्या पोलिसांना विविध गुन्ह्यांसाठ हवा आहे. आयकर विभाग आणि पासपोर्ट विभागानं हसन अलीवर धोकेबाजी, प्रमाणापेक्षा जास्त संपत्ती जमा करणे, बनावट पासपोर्ट बनवणे अशा प्रकारचे 18 गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्याच्यावर एकापेक्षा पासपोर्ट वापरल्या प्रकरणी आणि खोटा रहीवासी दाखला दिल्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोर्टानं हसन अलीला 19 डीसेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

close