तारापूर अणूऊर्जा केंद्राजवळच्या समुद्रात सापडला महाकाय पाईप

December 16, 2008 5:41 AM0 commentsViews: 6

16 डिसेंबर, मुंबईतळ डहाणूपाशी चिंचणीच्या समुद्र किनार्‍यावर एक 130 फूट लांबीचा आणि 3 फूट व्यासाचा महाकाय असा पाईप सापडलाय. तारापूर अणूऊर्जा केंद्रापासून फक्त 3 ते 4 कि.मी. अंतरावर हा पाईप सापडलाय. गेल्या 4 महिन्यातली अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. तारापूर ऊर्जा केंद्र हे भारतातलं सर्वात मोठं ऊर्जा केंद्र आहे जिथे 1400 मेगावॅट विजेची निर्मिती होते. 14 डिसेंबरला दुपारी मासेमारी करणार्‍या काही स्थानिक कोळ्यांना हा पाईप दिसला. त्यांनी ताबडतोब स्थानिक पोलिसांना आणि कस्टम्सच्या लोकांना याबद्दल कळवलं. जेंव्हा कस्टम विभागाच्या एका अधिकार्‍याला याबद्दल विचारले तर त्याने हा पाईप हाजिरा ओएनजीसी प्रोजेक्टचा भाग असू शकतो असं सांगितलं.गुजरात मॅरिटाईम बोर्डाचे अधिकारी चिंचणीला याची तपासणी करण्यासाठी येऊ शकतात असंही त्यानं सांगितलं. पण 26/11 च्या घटनेनंतरही हाजिरा ते चिंचणी तरंगणारा हा महाकाय पाईप कस्टम्स विभागाच्या गस्त घालणार्‍या पथकाला कसा दिसला नाही ? याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

close