औरंगाबादमध्ये पेट्रोलची टंचाई

December 16, 2008 12:45 PM0 commentsViews: 4

16 डिसेंबर औरंगाबादशेखलाल शेख भारत पेट्रोलियम कंपनीनं पेट्रोल वितरकांकडून ई-बँकिंगद्वारे अ‍ॅडव्हॉन्स पेमेंट घेणं सुरू केलं आहे. कंपनीच्या खात्यावर जोपर्यंत पैसे जमा होतं नाहीत तो पर्यंत टँकर भरला जातं नाही. परिणामी औरंगाबाद शहरात एक दिवसाआड पेट्रोल पुरवठा होतं असल्यानं पेट्रोलची टंचाई निर्माण झाली आहे.औरंगाबाद शहरात भारत पेट्रोलियमचे 8 पंप शहरातल्या मुख्य रस्त्यावर आहेत. या पंपांवर गेल्या तीन दिवसांपासून टंचाई जाणवत आहे. याआधी डिमांड ड्राफ्ट तसंच चेकनं पैसे भरले जायचे. पण त्यात आता बदल करून ई-पेमेंटद्वारे पैसे भरावे लागतात. अशापद्धतीने पेमेंट केल्यामुळे, टँकर उशिरा शहरात पोहचतात. मात्र त्याचा फटका बसतोय तो सर्वसामान्य नागरिकांना.ई-अकाऊंटमध्ये चेक भरल्यानंतर तो आधी रिझर्व्ह बँकेत आणि नंतर भारत पेट्रोलियमच्या खात्यात जमा होतो. त्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंतची डेडलाईन संपते आणि पेट्रोल, डिझेल एक दिवसाआड मिळतं.शहरातील 28 पेट्रोल पंपात दररोज 1 लाख 175 लिटर पेट्रोल तर 2 लाख लिटर डिझेल विक्री होत आहे. मात्र ई-पेमेंट वेळेवर न झाल्यानं शहरात जवळपास 80 हजार लिटर पेट्रोलचा तुटवडा जाणवतोय. ई-बँकींग व्यवहार नियमित होईपर्यंत शहरात पेट्रोल, डीझेलची टंचाई जाणवणार आहे.

close