मुंबईत भरलं युरोपियन चित्रकारांनी साकरलेल्या हिंदुस्तानचं प्रदर्शन

December 16, 2008 1:44 PM0 commentsViews: 8

16 डिसेंबर, मुंबई भक्ती पेठकर मुंबई म्हणजे कलेची नगरी. इथे निरनिराळ्या कलांची प्रदर्शनं भरत असतात. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयातल एक खास कलाप्रदर्शन भरलं आहे. हे प्रदर्शन खास यासाठी तर यात युरोपियन चित्रकारांनी त्यांच्या कलात्मक दृष्टीने साकारलेला, पाहिलेला हिंदुस्थान आहे. वॉटर कलर्स च्या माध्यमातून तयार केलेल्या 150 पेक्षाही जास्त कलाकृती इथे पहायला मिळणार आहेत.मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात भरलेलं चित्रांचं प्रिदर्शन हे दिनेश आणिार्षा ठक्कर यांनी भरवलेलं आहे. यात युरोपातल्या आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या आर्टिस्टनी साकारलेला भारत पहायला मिळणार आहे. इकडचा सगळा माहोल एकदम आर्टिस्टक आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी असणारी ब्रिटीश काऊन्सिलच्या अधिकार्‍यांची उपस्थितीही लक्षवेधी होती. " इथे जवळपास गेल्या तीन शतकातला भारत साकरला आहे. त्यावेळेचे काही टची मूव्हमेण्ट आणि प्रसंग सगळ्या इथल्या चित्रांच्या माध्यमांतून पहायला मिळणार आहे. 17, 18, 19 आणि आताच्या 21 शतकातल्या भारताच्या छबी इथे पहायला मिळणार आहेत, " अशी माहिती ब्रिटीश काऊन्सिलच्या अधिकारी विकी ट्रॅडिन यांनी दिली. यामध्ये अठराव्या शतकातला मुंबईचा रस्ता आहे. त्याकाळी साजरा करण्यात येणारा नारळी पोर्णिमेचा सण आहे. भारतातल्या राजे- माहाराजांचा दिमाखदार कलाकृती आहेत. आज आर्ट मार्केटमध्ये या कलाकृतींची किंमत कित्येक कोटींच्या घरात आहे. यातल्या कलाकृतींचं विविध तंत्र वापरून या कलाकृतींचं संवर्धन केलं आहे. 300 वर्ष जुन्या असणा-या कलाकृतींचं संवर्धन केलं तरी कसं जातं, हा प्रश्न सगळ्यांना पडतोय. त्याबाबत संग्रहालयाचे क्युरेटर नानक गांगुली सांगतात, " एखाद्या जुन्या वस्तूचं जतन कसं करायचंअसेल तर ती वस्तू किती साली जन्माला आली हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे काही रासायनिक प्रक्रिया करून त्या वस्तूंचं जतन करता येतं. "भारतात अजून रिस्टॉरेशनचं टेक्निक डेव्हलप होतंय पण समाधानाची गोष्ट हीच की अशा आर्ट कलेक्टरसारख्या खासगी कलेक्शन मधून या अमूल्य कलाकृती जपल्या जातात. आणि जर का तुम्हाला तीन शतक जुना भारत पहायचा असेल तर या कलेक्शन ला जरूर भेट द्या.

close