सरकारच्या आथिर्क धोरणावर राहुल बजाज यांची टीका

December 16, 2008 2:09 PM0 commentsViews: 8

16 डिसेंबर, नवी दिल्ली बजाज ऑटो इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी आज लोकसभेत सरकारच्या आथिर्क धोरणावर टीकास्त्र सोडलं. देशात मंदी नाही, असं अर्थमंत्री म्हणत असले तरी तोट्यात चाललेला माझा बिझनेस फुंकून टाकणं मला शक्य नाही, तेव्हा सरकारनं ऑटो इंडस्ट्रीला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. राहुल बजाज यांना यावेळी प्रत्युत्तर देताना माजी अर्थमंत्री पी . चिदंबरम यांनी सरकारनं ऑटो इंडस्ट्रीसाठी जेवढी मदत करता येणं शक्य होती तेवढी केल्याचं सांगितलं. आता इंडस्ट्रीनं स्वत:च्या बळावर आर्थिक अडचणींचा सामना करावा, असंही त्यांनी सुनावलं.

close